मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी पुन्हा एकदा पडण्यासंदर्भात भाष्य केले आहे. सत्तेत पुन्हा येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नसून हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण कोणावर नाराज आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले. (we will not overthrow the coalition government, but we will give options on the day it falls says devendra fadnavis)

विधिमंडळाचे अधिवेश ठरवण्याबाबतच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहिले होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्यासंदर्भातील विक्तव्य केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे अनेत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आम्ही जनतेला जबाबदार आहोत. सत्तेत येण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही. देशाच्या ७० ते ७२ वर्षांच्या कालखंडात अशा प्रकारची सरकारे चाललेली आपण पाहिलेले नाही. मात्र, हे सरकार आम्ही पाडणार नाही, तर हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असे ते म्हणाले. जो पर्यंच आम्ही विरोधी पक्षात आहोत, तो पर्यंत आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहोत, असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
महाविकास आघाडी सरकारच्या तीन घटकपक्षांमध्ये सुसंवाद दिसत नाही. त्यांच्यात विसंवादच आहे. त्यांचा आता एकमेकांवर विश्वासही राहिलेला नाही, असे सांगतानाच, तुमच्या भानगडींमध्ये राज्यातील जनतेला का भरडता आहात, असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला किंवा एकमेकांच्या गळात गळे घाला, मात्र तुम्ही जनतेला भरडू नका, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहे की नाही ते मला माहीत नाही, मात्र जनता सरकारवर नाराज आहे हे नक्की, असे सांगतानाच ही तीन पक्षांची नौटंकी असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here