‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं फत्ते केलेल्या एका थरारक मोहिमेवर आधारित आहे. चित्रपट पाहताना शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती, अष्टावधानी नेतृत्वाची त्यांच्या शौर्याची महती, साथीदारांचा अजोड पराक्रम, गनिमीकावा, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवून त्याला कोंडीत पकडण्याची विशेष कला आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं गनिमावर विजय संपादन करण्याचा ध्यास या गोष्टींचं अत्यंत बारकाव्यानिशी चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आलेलं आहे. प्रत्येक सैनिकानं पाहावा असा हा चित्रपट असल्यानं त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूनं ‘मराठा लाइट इन्फंट्री’ अर्काइव्हमध्ये ‘फत्तेशिकस्त’चा समावेश करण्यात येणार आहे.
भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी, आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाचे दैवत आहे. बोल श्री शिवाजी महाराज की जय ही आमची युद्धघोषणा आहे. आपण शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये, हेच मराठा रेजिमेंटमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येकाला शिकवले जाते. बाकी चपळता, उत्तम शरीरसंपदा, काटकपणा, गनिमी कावा आणि युद्धकौशल्य त्यांच्याकडे असतेच, त्याच्या बळावरच मराठा लाइट इन्फंट्री आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे, आणि यापुढेही राहील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times