काँग्रेसचे प्रवक्ते यांनी अमरनाथ यात्रेच्या निर्णयाचा हवाला देत एक ट्वीट केलं आहे. ‘अमरनाथ यात्रा रद्द करणारा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रह धरत आहे. दुटप्पीपणा तो हा! धारकऱ्यांच्या पाठिराख्या भाजपाला वारीशी व वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही. फक्त हीन पातळीचं राजकारण करायचं आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.
वाचा:
पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रह धरणाऱ्या भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीवरही सचिन सावंत यांनी तोफ डागली आहे. ‘कुठे गेले ते अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?, अशी विचारणा करतानाच, ‘हिंमत असेल तर आता मोदींच्या निर्णयाविरुद्ध बोला,’ असं आव्हानच सावंत यांनी भाजपला दिलं आहे.
मागील वर्षी अनलॉक सुरू होताच मंदिरे उघडण्यासाठी भाजपनं राज्यभर घंटानाद आंदोलन केलं होतं. यंदा पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं भाजपनं राज्य सरकारला घेरलं आहे. भाजपची अध्यात्मिक आघाडी सातत्यानं सरकारवर हल्ले चढवत आहे. यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, असा आग्रह भाजपनं धरला आहे. निर्बंधासह का असेना, पण पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची इच्छा असल्याचा दावा भाजपनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारकऱ्यांसोबत चर्चा करून नियमावली तयार करावी. पायी वारीच्या बाबतीत यंदा आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपनं दिला आहे. मात्र, यंदाही प्रातिनिधिक स्वरूपात वारी होणार आहे. केवळ मानाच्या दहा पालख्या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ‘लालपरी’ धावणार आहे. त्यानंतरही भाजपनं सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आता भाजपला खिंडीत गाठलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times