मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे देखील उपस्थित होते. भाजप आणि शिवसेनेमधील वाद राज्याला आता काही नवीन नाही. त्यामुळे अशा दोन्ही पक्षीय नेत्यांच्या भेटी झाल्या की राजकीय चर्चांना उघाण येतं. आशात ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली आणि यामध्ये काय चर्चा झाली याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
दरम्यान, या भेटीनंतर भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता दोघांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य दिलं. त्यामुळे यागचा नेमका अर्थ काय ? असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इतकंच नाहीतर, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत ही राजकीय संकृतीचं दर्शन असल्याचं म्हणत प्रत्येक भेटीला संकेतामधे बदलण्याची गरज नाही असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times