विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे आज विधानभवनात आले होते. ही बैठक आटोपून निघत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते , माजी मंत्री आणि आमदार यांनी त्यांची गाडी अडवली. मुख्यमंत्र्यांनी लगेचच गाडी थांबवली आणि ते गाडीतून उतरले. भाजपच्या नेत्यांनी एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडं दिलं. मुख्यमंत्र्यांनी त्यावर नजर टाकली आणि नेत्यांशी चर्चा सुरू केली.
वाचा:
हे सगळं सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर हे धावत पुढं आले. निवेदन घेण्यासाठी मुख्यमंत्री थांबल्याचं लक्षात येताच नार्वेकरही गप्पांध्ये सहभागी झाले. साहेब, या लोकांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केलाय का, असं नार्वेकर गमतीनं म्हणाले. त्यावर आम्ही केव्हाही येऊ शकतो असं प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकरांच्या या उत्तरावर यांना आत्ताच कारमध्ये घ्या. शिवबंधन बांधूया असं नार्वेकर म्हणाले. दरेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ‘आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे,’ असं उत्तर दिलं. त्यावर पुन्हा एकदा हंशा पिकला.
मनमोकळ्या गप्पांनंतर मुख्यमंत्री पुन्हा जायला निघाले तेव्हा आम्हाला तुमच्या कारमध्ये घ्या, अशी विनंती भाजपच्या तिन्ही नेत्यांनी केली. मात्र, करोनाच्या नियमांमुळं एकालाच प्रवेश मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगताच, तिघांनीही दिलखुलास हसून त्यांना दाद दिली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times