माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आमदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले आहे. सरनाईक यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू जाली आहे. भाजप- शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चाही ऐकायला मिळत आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला बळ मिळत आहे.
प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्राद्वारे भाजपशी जुळवून घेण्याची विनंती मु्ख्यमंत्र्यांना केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बरे चालले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरनाईक यांच्या याच पत्रावर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
केवळ प्रताप सरनाइकच नाही, तर शिवसेनेते ९० टक्के आमदार, खासदार या सरकारवर नाराज आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या बरोबरच सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच आमदारांची कामे होत असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापले पक्ष मजबूत करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना हा पक्ष कमजोर बनत चालला आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. याच कारणामुळे शिवसेनेचे आमदार आणि खासदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांवर लोकांचा रोष असून हे सर्व पाहता आता भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असेही बावनकुळे यांनी पुढे म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र शनिवारी, १९ जून या दिवशी प्रसारमाध्यमांच्या हाती आले. त्या पत्रात त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times