कोल्हापूर: जयप्रभा आणि प्रश्नी येत्या आठवड्यात नगरविकास विभागात बैठक बोलवून स्टुडिओचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू असे खासदार यांनी सांगितले. (meeting for jayapraha and shalini studio to be arranged in the urban development department next week)

कोल्हापूरच्या चित्र पट क्षेत्राचे वैभव असलेले २ स्टुडिओ शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व संपुष्टात येणाच्या मार्गावर आहे. त्यातच नगरविकास खात्याकडून शालिनी सिनेटोन प्रश्नी विकासकाला बांधकाम परवाना द्या, असा आदेश मिळाल्याने सर्व चित्रकर्मी लोकांच्यात चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या पुढाकाराने सर्व चित्रकर्मी यांनी खास धैर्यशील माने यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि सविस्तर माहिती दिली.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव,सतिश बिडकर, राहूल राजशेखर, आनंद काळे , सुरेखा शहा, अर्जुन नलवडे, छाया सांगावकर, रोहन स्वामी,अजय कुरणे ,अवधुत जोशी , मंजित माने, स्मिता सावंत,अमर मोरे,अशोक माने, अमर मठपती, रवींद्र बोरगावकर,अरुण भोसले चोपदार, अनिल चोपदार उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-

कोल्हापुरात शालिनी आणि आहेत. जयप्रभा स्टुडिओत अलीकडे चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. ही जागा व्यावसायिक कारणासाठी देण्यास सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे शालिनी स्टुडिओ च्या जागेवर प्लॉट पाडण्यात आले आहेत. ती काळी एकेकाळी बहुसंख्य मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच दोन स्टुडिओमध्ये होते, पण दोन्ही मालकांनी सांस्कृतिक विकास अपेक्षा व्यावहारिक भूमिका घेतल्यामुळे या स्टुडिओतील चित्रीकरण पॅकअप झाले. आता तर येथे प्लॉट पाडून इमारती उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. याला चित्रपट कृतीतून मोठा विरोध होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. चित्रपट महामंडळाने यात पुढाकार घेतला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here