जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ८२४ जणांना करोना संसर्ग झाला आहे. त्यातील ४ लाख ६७ हजार ९३ बाधित उपचारानंतर बरे झाले. मंगळवारी उपचारानंतर आजारमुक्त झालेल्या १२० जणांमुळे सध्या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७१० इतकी नोंदवली गेली. त्यातील ६४७ बाधित महापालिकेच्या तर ६३ अॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उपचार घेत आहेत.
कोविडची बाधा होऊन उपचारादरम्यान आजवर ९०२१ जणांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यातील १४२१ मृतक हे जिल्ह्याच्या बाहेरून नागपुरात उपचारासाठी रेफर करण्यात आलेल्यांपैकी होते. तर यात शहरातील ५२९४ आणि ग्रामीण भागातील २३०६ जणांचा समावेश आहे.
म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भावही झाला कमी; नव्याने ६ बाधित, २ मृत्यू
कोविडचा विळखा सैल होत असताना या आजारावर मात केलेल्यांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचे संक्रमण होत असल्याचं पाहायला मिळतं. आज नव्याने विभागात ६ जणांना ब्लॅक फंगसचे निदान करण्यात आले. तर शहरात उपचार घेत असलेल्या आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाने घेतली. त्यामुळे विभागात आतापर्यंत ब्लॅक फंगसच्या विळख्यात अडकलेल्यांची संख्या १८१५ इतकी नोंदविली गेली. यातील सर्वाधिक १३२८ ब्लॅक फंगसग्रस्त नागपूर जिल्ह्यातील आहेत.
उपराजधानीसोबतच वर्धेत १२४ , चंद्रपुरात ९९, गोंदियात ४६, भंडारात १८ जणांना या बुरशीने गाठले. हा आजार झाल्यानंतर आतापर्यंत विभागात १५५ जणांना प्राण गमवावे लागले. सोबतच सध्याच्या स्थितीत विभागामध्ये ४९९ ब्लॅक फंगसचे रुग्ण सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याखेरीज १२८९ जणांवर विविध प्रकारच्या शल्यक्रिया करून त्यांच्या शरीरात पसरलेली बुरशी दूर करण्यात आली. तर ११२५ जणांनी आधी करोना आणि नंतर झालेल्या ब्लॅक फंगसच्या संक्रमणावरही मात केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
single free dating sites without registering totally free dating site date online free
site free sites of dating