मुंबई: राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे सुरू झाले असून एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांचे लसीकरण करून राज्याने आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री यांनी समाधान व्यक्त करतानाच सर्वांचे अभिनंदन केले आहे. ( )

वाचा:

महाराष्ट्र प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी दि. २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

वाचा:

पुण्यात ५२ हजार २९९ जणांचे लसीकरण

शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी ५२ हजार २९९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे शहरात २२ हजार ७८६ जणांचे लसीकरण झाले असून जिल्ह्यातील दिवसभरातील हे सर्वाधिक लसीकरण ठरले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३३ लाख ७१ हजार १८४ जणांचे लसीकरण झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. पुणे जिल्ह्यात १८ ते ४४ वयातील व्यक्तींचे लसीकरण मंगळवारपासून सुरू झाले. जिल्ह्यातील एकूण ३८७ केंद्रावर लसीकरण झाले. दुपारी चार वाजेपर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ७४६ जणांचे लसीकरण करण्यात आले. सांयकाळपर्यंत एकूण लसीकरण म्हणून ६९ हजार २६७ एवढ्या जणांचे लसीकरण झाल्याची नोंद पोर्टलवर करण्यात आली होती. मात्र, या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here