सदनिकांसाठी यापूर्वी २९ मे रोजी सोडत काढली जाणार होती. ‘सदनिकांसाठी दोन जुलैला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. नागरिकांना ‘म्हाडा’च्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. विजेत्यांना ई-मेल आणि ‘एसएमएस’द्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे,’ असे ‘म्हाडा’चे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सदनिकांसाठी १४ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र, करोनामुळे एक महिना मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत ५७ हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ‘म्हाडा’च्या २१५३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ७५५ सदनिका अशा २९०८ सदनिकांचा यात समावेश आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times