वाचा:
गेल्या काही दिवसांपासून हे नव्या जोमानं सक्रिय झाले असून राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडंच मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कशासाठी होती, हे अखेरपर्यंत कळू शकलं नाही. प्रशांत किशोर हे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरविणार असल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र, किशोर यांनी ती चर्चा खोडून काढली होती. त्यातच मंगळवारी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी देशातील १५ नेत्यांची बैठक झाली. यात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर हे आज पुन्हा एकदा पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. प्रशांत किशोर यांची पवारांसोबतची ही तिसरी बैठक असल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
तिसऱ्या आघाडीची तयारी नाही!
राष्ट्र मंचाच्या नेत्यांसोबत काल झालेली बैठक ही तिसऱ्या आघाडीच्या उभारणासाठी नव्हती, हे खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाचं संकट हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकार कमी पडलं आहे. त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्या विरोधात रोष आहे. मात्र, त्यामुळं मोदींचं राजकीय नुकसान किती होईल याबाबत साशंकता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस चाचपडत आहे. केंद्र सरकारला धारेवर धरण्यात कमी पडत आहे. अशा परिस्थितीत नेमकं काय करता येईल, यावर राष्ट्र मंचासोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times