नवी दिल्लीः काँग्रेस सरचिटणी असलेल्या प्रियांका गांधी राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी लोकसभेचे सदस्य आहेत. आता प्रियांका गांधींना राज्यसभेत पाठवण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे.

मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त आहेत. या जागांसाठी येत्या ५ मार्चपासून अर्ज भरण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेसला जोगा मिळणार आहेत. त्यापैकी एका जागेवर प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठण्याची मागणी मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलीय. ही मागणी आता काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनीही लावून धरली आहे.

प्रियांका गांधी यांना काँग्रेसमध्ये महत्वाचं स्थान आहे. त्या सध्या काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत. आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारीही त्या सांभाळत आहेत. त्यांना राज्यसभेवर पाठण्याचा विचार काँग्रेस नेतृत्त्वाकडून आधीपासूनच सुरू आहे. तसंच पक्षातील नेत्यांचा यासाठी दबाव आहे आणि त्यांनी आवाहनही केलंय. आता निर्णय प्रियांका गांधी आणि गांधी कुटुंबीयांनी घ्यायचा आहे, असं काँग्रेसमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितलं.

राज्यसभेच्या जागांसाठी काँग्रेसकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. अशातच गांधी कुटुंबीयांशी निष्ठावंतांनी राज्यसभेसाठी प्रियांका गांधींचं नाव पुढे केलंय. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना प्रश्न विचारण्यात आला होता. प्रियांका गांधींच्या राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही. पण प्रियांका गांधींना राज्यसभेवर पाठवावं, अशी मागणी काँग्रेसमधील नेत्यांनी जाहीरपणे सांगितलंय. पण पक्ष म्हणून सध्या काही वक्तव्य करू शकत नाही, असं सुरजेवाला यांनी स्पष्ट केलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here