कोल्हापूर: करोनाचे संकटाशी मुकाबला करतानाच जिल्ह्यातील अनेकजण एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. संकटकाळात लढण्यासाठी बळ देत आहेत. पडदयामागे राहून कार्यरत असणाऱ्या अशा अनेक खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी कोल्हापूरकरांनी अभिनंदनाचे फलक झळकविले आहेत. पालकमंत्री यांच्या पुढाकाराने चौकाचौकात झळकलेल्या या फलकामुळे या हिरोंना लढायला आणखी बळ मिळणार आहे. (Kolhapurkar salutes Karona warriors)

गेल्या पंधरा महिन्यापासून कोल्हापूरकर जिल्हात करोनाच्या संकटाशी लढा देत आहे. इतर जिल्ह्यात हे संकट कमी होत असताना या जिल्ह्यातील कहर मात्र कायम आहे. पण अशा संकट काळात जे मदतीचे हात पुढे येत आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद आहेत. जिवाची पर्वा न करता कोविड सेंटर उभारणारी व्हाईट आर्मी, व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट असो वा गरजूंना अन्नदान करणारे संकटमोचक. करोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाची शववाहिका चालविणारी प्रियंका पाटील असो वा पॉकेटमनीतून रूग्णांच्या नातेवाईकांना नाष्टा देणाऱ्या युवती. अशोक रोकडे, अर्पिता राऊत, श्रेया चौगले, श्रुती चौगले, आचल कट्यारे, ऐश्वर्या मुनीश्वर, संभाजी साळुंखे, अवधूत भाट्ये, डॉ. संगीता निंबाळकर, संताजी घोरपडे, मिलींद धोंड अशी अनेक नावे घेता येतील. याशिवायही नावासाठी नाही तर सेवेसाठी या उद्देश डोळ्यासमोर ठवून काम करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. विविध व्यक्ती, संघटनांचे हे काम इतरांना आदर्शवत आहे. एकमेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या या मनोवृत्तीला सलाम करण्यासाठी ‘सलाम कोल्हापूरकर’ हा उपक्रम राबविला जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-
डॉक्टर, पोलिस, नर्स, फ्रंटलाइन वर्कर्स, प्रशासन या संकटांचा सामना करत आहेत. त्यांच्या सोबतीला सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, युवा पिढी जिवाची पर्वा न करता संकटाला सामोरे जाताना मदत करत आहे. पडद्यामामागे राहणारे हे जनसामान्य हेच खरे संकटकाळातील हिरो आहेत. त्यामुळे या हिरोंचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी कौतुकाचे फलक तयार करण्यात आले. हे फलक शहरासह जिल्ह्यातील चौकाचौकात लावण्यात आले आहेत. अजूनही अनेक फलक लावण्यात येणार आहे. जनतेनेही याचे अनुकरण करत अभिनंदनाचे फलक लावावेत असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
यामुळे ज्यांनी माणुसकी हाच धर्म मानत या कोल्हापूरकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी वेगळ्या पद्ध्तीने पाठ थोपटण्याचा हा उपक्रम आहे. सत्काराच्या पलिकडे जात राबविले जात असलेल्या या उपक्रमात कोल्हापूरकर सहभागी झाले तर निश्चितच कोल्हापुरातल्या चौकाचौकात अभिनंदनाचे आणि कौतुकाचे फलक झळकतील यात शंका नाही.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here