उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात राणा अयुब यांनी ट्वीट केलं होतं. तसंच, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अयुब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं त्यांना चार आठवड्यांचा अंतरीम जामीन दिला आहे.
वाचा:
या सगळ्या पार्श्वभूमीवर अयुब यांना सध्या सोशल मीडियात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व धमक्यांचे स्क्रीनशॉर्ट शेअर करून राणा अयुब यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलीस या लोकांवर कारवाई करतील का? असा प्रश्न विचारला होता. त्या ट्वीटवर सुप्रिया सुळे यांनी रीट्वीट केलं होतं. ‘सायबर बुलिंग हा सोशल मीडियात सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. सरकारनं त्यात त्वरीत लक्ष घालावं, अशी मागणी सुळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना टॅग करून केली होती.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या ट्वीटची लगेचच दखल घेत कारवाईचं आश्वासन दिलं. त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या अकाऊंटवरून शिवीगाळ करण्यात आली, त्यांचा शोध सुरू केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times