राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलेले असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. त्यानंतर सरकारने केवळ आश्वासन देण्याचे काम केले. ओबीसींच्या नेत्यांनी निवडणुका होऊ देणार नाही असे जाहीर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर केल्या जातात हे ओबीसी समाजाचा विश्वासघात असल्याची घणाघाची टीका फडणवीस यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याचेही फडणवीस म्हणाले. मात्र हे जराही सहन करण्याजोगी नसून सरकारने काहीही करून हस्तक्षेप करावा आणि या जाहीर झालेल्या निवडणुका रद्द कराव्यात, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. जर या निवडणुका रद्द केल्या गेल्या नाहीत तर भाजप ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीने ओबीसी समाजाचा विश्वासघात करणे बंद करावे असेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार रद्द करण्यात आले होते. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने काल ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलैला मतदान होणार आहे, तर २० जुलै या दिवशी मतमोजणी होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times