काल एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता.
क्लिक करा आणि वाचा-
लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ९१ लाखांहून अधिक लस मात्र राज्यात देण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
पुणे शहरातही विक्रमी लसीकरण
पुणे शहर जिल्ह्यात दिवसभरात ६२३ केंद्रावर आतापर्यंतच्या लसीकरणामध्ये विक्रमी लसीकरण झाल्याची ‘को विन’ पोर्टलवर बुधवारी नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ९० हजार ५३० जणांना लसीकरण झाले आहे. यापूर्वी ८५ हजारापर्यंत लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली होती. यामुळे आता दिवसात एक लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करणे येत्या काही दिवसात शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात एकूण १० हजार ४७० नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकूण ११ हजार ०३२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आज दिवसभरात १६३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times