मुंबई: भीम आर्मीचे प्रमुख यांच्या आझाद मैदानातील २१ फेब्रुवारीच्या नियोजित सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पोलिसांनी देत या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी आणि एनपीआर विरोधात ही सभा होणार होती.

केंद्र सरकारनं नुकताच लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, एनपीआर विरोधात चंद्रशेखर आझाद यांनी सभा आयोजित केली होती. आझाद मैदानात २१ फेब्रुवारीला ही सभा होणार होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी त्यांच्या या नियोजित सभेला परवानगी नाकारली आहे.

चंद्रशेखर याआधी जानेवारीत हैदराबादमध्ये गेले होते. जनसभेला संबोधित करण्याआधीच त्यांना पोलिसांनी अटक केली होती. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बैठकीला परवानगी दिली गेली नव्हती, असं कारण पोलिसांनी दिलं होतं. मेहदीपट्टणमच्या क्रिस्टल गार्डनमध्ये २६ जानेवारी रोजी बैठकीला संबोधित करण्यासाठी जात असताना चंद्रशेखर यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here