मुंबईतील करोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मुंबई महानगरपालिकेला यश मिळाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांनंतर गेले काही दिवस करोनाला अटकाव झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट आता ९५ टक्के इतका असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ७२८ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या ३७ हजार ९०५ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या १२ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८८ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईतील करोनाची आजची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ८६३
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ७११
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९११२८
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १४५७७
रुग्ण दुप्पटीचा दर- ७२८ दिवस
कोविड वाढीचा दर ( १६ जून ते २२ जून)- ०.०९ %
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, राज्यात देखील आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात एकूण १० हजार ४७० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याच दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकूण ११ हजार ०३२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १६३ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times