विजय गणाचार्य हे तरूण वयातच गिरणी कामगारांच्या चळवळीशी जोडले गेले होते. त्यांनी हॉटेल कामगार युनियनची मुंबईत बांधणी केली. जनरल कामगार युनियन, जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचेही अनेक वर्षे काम केले. वृद्धपकाळात जेष्ठ नागरिकांचे हाल होत असल्याने त्यांची संघटना बांधून ज्येष्ठांचे प्रश्न धसास लावले.
नेहरूनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे साप्ताहिक ‘युगांतर’च्या संपादकपदाची जबाबदारी काही काळ घेतली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई सचिव मंडळाचे व महाराष्ट्र कौन्सिलचे सदस्य तसेच ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. गणाचार्य यांच्या निधनाने लढवय्या सहकारी आम्ही गमावला आहे. त्यांना क्रांतिकारी लाल सलाम, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई कौन्सिल सहभागी आहे, असं ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. प्रकाश रेड्डी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times