नवी दिल्लीः करोनाचा प्रादुर्भा रोखण्यासाठी प्रभावी रणनीती आणि कोविडसंबंधी योग्य व्यवहाराचे पालन करणं ( ) गरजेचं आहे. असं झाल्यास आरोग्य यंत्रणेवर दबाव येईल एवढ्या मोठ्या संख्येत तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढणार ( ) नाहीत. आतापर्यंत देशातील फक्त २.२ टक्के लोकसंख्येवर करोना संसर्गाचा परिणाम झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल म्हणाले. आपल्याला अजूनही जोखिम असलेल्या किंवा अतिसंवेदनशील अशा ९७ टक्के लोकसंख्येची सुरक्षा करण्यासाठी सावध राहिले पाहिजे. आपल्या सुरक्षा उपयांमध्ये कुठलीही कमतरता राहू नये यासाठी प्रादुर्भाव रोखण्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. करोनासंबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केल्यास आणि अपेक्षित वर्तन केल्यास करोनाची तिसरी लाट आली तरी आरोग्य यंत्रणेवर दबाव येणार नाही, असं ते म्हणाले.

करोनावरी लसीकरणात एक मोठी अडचण आहे आणि ती म्हणजे लस घेण्यात होत असलेली टाळाटाळ. अनेक भागांमध्ये लसीचे लाभार्थी खासकरून ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये सोशल मीडियावरील मेसेजेसवरील अफवांमुळे लक घेत नाहीए. नागरिकांमधील गैरसमज दूर करणं गरजेचं आहे, असं अग्रवाल म्हणाले. एका मीडिया वर्कशॉपमध्ये अग्रवाल बोलत होते.

करोनावरील लस किती काळ सुरक्षा देईल? असा प्रश्न उपस्थित करण्यात ( ) आला. यावर अग्रवाल यांनी उत्तर दिलं आहे. करोनावरील लस घेतल्यानंतर ६ ते ९ महिने आपल्याला सुरक्षा मिळू शकते. यामुळे गरज पडल्यास नागरिकांना करोनावरील लसीचा एक बूस्टर डोसही दिला जाऊ शकतो. तसंच करोनासंबंधी जारी केलेल्या नियमांचे पालन केल्यास तिसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळणार नाहीत, असं लव अग्रवाल म्हणाले.

कॉकटेव वॅक्सिन किती प्रभावी आहे किंवा वेगवेगळ्या लसींचे डोस घेण्यावर प्रश्न विचारण्यात आला. या विषयावर संपूर्ण विश्लेषण करणं बाकी आहे. यामुळे कॉकटेल लसीकरण केलं जाणार नाही. आपण एकाच लीसचे दोन डोस घेणं आवश्यक आहे, असं आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी वीणा धवन यांनी सांगितलं. डोस घेतल्यानंतर ३० मिनिटं देखरेखीखाली असणं आवश्यक आहे. कारण लसीचे दुष्परिणाम हे बहुतेककरून ३० मिनिटांत दिसून येतात, असं त्या म्हणाल्या. गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. तसंच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात काही अडचणी आहेत. यामुळे ते सुरू करण्यात आलेले नाही, असं वीणा धवन यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here