ब्रिटनमधील करोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत असलेल्या नव्या वेरियंटचा छडा लागल्यानंतर भारतातने १० प्रयोगशाळांची एक संघटना बनवली. एप्रिलमध्ये यात आणखी १८ प्रयोगशाळांचा समावेश करण्यात आला. या प्रयोगशाळांमध्ये रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले जातात. या प्रयोगशाळांमध्ये व्हायरसची जिनोम सिक्वेंसिंग आणि त्यात होणारे बदल म्हणजे म्युटेशनचा तपास केला जातो, असं आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
भारतात डेल्टा वेरियंट हा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आढळून आला होता. या वेरियंटने एप्रिल-मे मध्ये देशात दुसरी लाट आली होती. वेरियंट ओळखणं आणि त्याचं अचूक रिपोर्टींग करण्याची यंत्रणा तयार आहे. पण कुठला वेरियंट धोकादायक रुप धारण करेल हे सांगणं अवघड आहे, असं ते म्हणाले.
देशात बुधवारी डेल्टा प्लस वेरियंटचे ४० रुग्ण आढळून आले. चिंतेचं कारण म्हणजे व्हायरसमध्ये बदल म्हणजेच म्युटेशन झाले आहे. या म्युटेशनमुळे व्हासरसने मानवी पेशींना चिकटून राहण्याची क्षमता वाढवली आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे संसर्ग आणखी वेगाने होऊ शकतो. पण याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र डेल्टा प्लस व्हायरस हा सध्या ९ देशांमध्ये आढळून आले आहे. भारतात डेल्टा प्लसचे रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशात आढळून आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times