विरोधी पक्षांच्या खासदारांनी बैठकीत लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. लसीची खरेदी, किंमत आणि लसीकरणात इतकी तफावत का आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप खासदारांनी याला तीव्र विरोध केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय फक्त शोध आणि विकासाचे काम करते. लसीची खरेदी, किंमत किंवा लसीकरण हे मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. यामुळे असे प्रश्न उपस्थित करून राजकारण करू नये, असं भाजप खासदार म्हणाले.
सल्लामसलत करण्यासाठी भाजप खासदार बैठकीतून बाहेर आले. काही वेळाने ते पुन्हा बैठकीत सहभागी झाले. समिती निश्चित अजेंड्यानुसार काम करेल, असं आश्वासन संसदीय समितीचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी भाजप खासदारांना दिलं. यानंतर समितीने लसीचे संशोधन आणि विकासावरून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामाचे कौतुक केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times