केरळच्या कोल्लममध्ये २४ वर्षीय विस्मया तिच्या पतीसोबत राहत होती. ती आयुर्वेदची विद्यार्थीनी होती. सोमवारी विस्मयाचा मृतदेह घराच्या बाथरुममध्ये फासावर लोंबकळलेल्या अवस्थेत आढळला होता.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी विस्मयानं आपल्या नातेवाईकांना ‘व्हॉटसअप’वर अनेक मॅसेज आणि फोटो पाठवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पतीकडून हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याची व्यथा विस्मयानं यात केली होती.
पीडितेच्या नातेवाईकांनी किरण कुमार याच्याकडून विस्मयाचा होत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षीच विस्मया आणि किरण कुमार यांचा विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी विस्मयाच्या कुटुंबांनी कुमारला १० लाख रुपयांच्या किंमतीची कार, एक एकर जमी तसंच सोन्याची १०० नाणे दिले होते.
यानंतर, पोलिसांनी विस्मयाचा पती एस किरण कुमार याला अटक केलीय. किरण कुमार हा राज्य सरकारमध्ये मोटर वाहन विभागाचा कर्मचारी आहे. त्याला कामावरून निलंबित करण्यात आलंय.
पोलिसांना मिळाला आहे. डॉक्टरांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढची कारवाई केली जाणार आहे. पीडितेच्या मित्र-मैत्रिणी, शेजारी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times