मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री एक मोठा अपघात थोडक्यात टळला. स्पाइसजेटच्या सामान नेणाऱ्या ट्रॉलीची विमानाच्या शिडीला धडक बसली. ही धडक विमानाला बसली असती, तर मोठ्या अपघाताची भीती होती. त्यात इंजिन बिघडले व कर्मचारी जखमी झाला.

प्रवाशांचे तसेच विमानातील अन्य सामान विमानापर्यंत आणण्यासाठी ट्रॉलीचा उपयोग केला जातो. त्यानंतर हे सामान एका इलेक्ट्रॉनिक शिडीतून विमानात चढवले जाते. रविवारी रात्री स्पाइसजेटच्या बोइंग ७३७ जातीच्या विमानात सामान चढविण्यासाठी ही ट्रॉली घेऊन कर्मचारी विमानाकडे निघाला. त्याच्या ट्रॉलीचा वेग अधिक होता व तो वेळीच नियंत्रणात आला नाही. त्यामुळे या ट्रॉलीची सामान चढविणाऱ्या शिडीला जोरदार धडक बसली. त्यानंतर ही शिडी इंजिनावर जाऊन आदळली. यामुळे इंजिन बिघडले व ट्रॉलीचा चालकही जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे स्पाइसजेटकडून सांगण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here