नवी मुंबईः आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज, गुरुवारी सीबीडी येथील सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून सिडको कार्यालयापासून १०० मीटर परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात केला. त्याशिवाय नवी मुंबई व पनवेल परिसरातदेखील बंदोबस्त आहे. ()

>> कळंबोली सर्कल येथे पुणे, अलिबागच्या दिशेने येणारी वाहतूक थांबविण्यात आली; पनवेल मुंब्रा मार्गांवर वाहनांची गर्दी.

>> मुंबईकडून पुणे आणि कोकणाकडे जाणारी वाहतुकीमध्ये

>> नवी मुंबईत येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना बंदी

>> सीबीडी सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यांना ८ ते रात्री ८ पर्यंत प्रवेश बंदी

>> मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे या भागातून तसेच रेल्वेकडे असलेला पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला

>> सीबीडी येथील सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार

>> भूमिपूत्र, आगरी, कोळी आंदोलनासाठी नवी मुंबईकडे रवाना

>> मनसेचे आमदार राजू पाटील आंदोलनात उतरणार

>> दि. बा पाटील यांच्या नावाच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांकडून मोर्चा

>> नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here