पुणेः आंबिल ओढ्यालगत असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचारी व पोलिसांविरोधात स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिस यांच्यात वाद झाल्यानं या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, स्थानिकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

महापालिकेनं आज सकाळपासून कारवाई करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेनं कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. तसंच, पालिकेनं बिल्डरच्या लेटरहेडवर नोटीस काढल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. मात्र, सदर जागा ही पुणे महापालिकेची असून बिल्डर नोटीस कसा काय पाठवू शकतो?, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिकांना बिल्डरनं नोटिस काढल्यानंतर महापालिकेनं कारवाई केली असल्याचा आरोपही स्थानिक करत आहेत. स्थानिकांच्या विरोधानंतरही पालिकेची कारवाई अजूनही सुरुच आहे. त्यामुळं पोलिस व स्थानिकांमध्ये झटापट झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

वाचाः

या अतिक्रमणामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे, असा आरोप काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. पुणे महापालिकेचे सत्ताधारी आणि बिल्डरचे लागेबंधे असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.

वाचाः

गेले १५ दिवस महापालिका आयुक्त, एसआरए अधिकारी यांची भेट घेत आहे. १५ जुलैपर्यंत एसआरएच्या संदर्भातील तक्रारीसंबंधी वेळ देण्याची मागणी करत आहे. ओढ्यामागील परिसरातील कोणतंही स्थलांतर करण्यात आलेलं नाही. एसआरएसाठी जी जागा रिकामी करायची आहे तिथे अतिक्रमण आणि सुरक्षेच्या नावाखाली तुघलकी पद्धतीने कारवाई केली जात आहे, असा आरोप शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here