नवी मुंबई: ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सध्या सुरू असलेला वाद राजकीय आहे. यापूर्वी यांच्या नावाबद्दल कोणाला आक्षेप नव्हता. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांनी आग्रह धरणं स्वाभाविक आहे. दि. बा. पाटलांचं नाव दिलं जावं अशी आमचीही इच्छा आहे,’ असं स्पष्ट मत दि. बा. पाटील यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलं आहे. (D. B. Patil Family Reaction on Naming)

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून राज्यात सध्या मतभेद आहेत. राज्य सरकारनं शिवसेनाप्रमुख दिवंगत यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर, मनसे अध्यक्ष यांनी हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव योग्य ठरेल, असं म्हटलं आहे. त्यावरून आता संघर्ष सुरू झाला आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या कृती समितीनं दिबांच्या नावासाठी आज सिडको कार्यालयाला घेराव घालण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी शेकडो आंदोलक बाहेर पडले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील यांच्या कुटुंबीयांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे की दि. बा. पाटील हा संघर्ष आता सुरू झाला आहे. खरंतर दिबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी अनेक वर्षे कष्ट घेतले होते. त्यांनी जे काम केलं ते सर्वांसमोर आहे. त्यामुळं विमानतळाला त्यांचं नाव दिलं जावं असं प्रकल्पग्रस्तांना वाटणं स्वाभाविक आहे. आमचीही तीच इच्छ आणि आग्रह आहे,’ असं त्यांच्या मुलानं स्पष्ट केलं. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा:

‘यापू्र्वी १० जूनला स्थानिकांनी आंदोलन केलं होतं. मात्र, मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळं दिबांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आजचं आंदोलन होत आहे. हे आंदोलन यशस्वी देखील होईल, असा विश्वास दिबांच्या मुलानं व्यक्त केला आहे. शांततेत आंदोलन करून सरकारला ताकद दाखवून देऊ, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here