ठाणे: नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यावे यावरून राज्यात सध्या घमासान सुरू आहे. राज्य सरकार शिवसेनाप्रमुख दिवंगत यांच्या नावाचा विचार करत आहे. तर, ठाणे, नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. मनसे अध्यक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव योग्य ठरेल. त्यावर वादही होणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता असली तरी राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट न केल्यानं दि. बा. पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी स्थानिकांनी नवी मुंबईतील सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दि. बा. पाटील नेमके कोण होते? त्यांच्या नावासाठी स्थानिक भूमिपुत्र इतके आग्रही का आहेत? यावर एक दृष्टिक्षेप:

दि. बा. पाटील यांचं पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. जिल्ह्यातील जासई इथं १९२६ साली त्यांचा जन्म झाला. ‘दिबां’चे वडील बाळू पाटील हे शिक्षक होते. सोबत ते शेतीही करत. शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या ‘दिबां’ना शिक्षणामध्ये चांगली गती होती. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले.

सामाजिक कामांची आवड असलेले दिबा लोकांसाठी लढता-लढता हळूहळू राजकारणात सक्रिय झाले. त्याकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या शेतकरी कामगार पक्षातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि बहरली. त्यातूनच पुढं ते पनवेलचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून गेले होते. राज्य विधानसभेचं विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भूषवलं होतं. लोकसभेत दोनदा त्यांनी रायगडचं प्रतिनिधित्व केलं. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी होत असताना दि. बा. पाटील हे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले. शेतकरी व प्रकल्पग्रस्तांसाठी लढे उभारले. तुरुंगवास भोगला.

वाचा:

सिडकोच्या प्रकल्पांमुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून दिला. रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेवटपर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढले. दिबा पाटील हे उत्तम वक्ते होते. त्यांच्या हाकेवर लाखो कार्यकर्ते आंदोलनासाठी सज्ज होत. त्या बळावरच त्यांनी व्यवस्थेच्या विरोधातील अनेक लढे जिंकले. राज्य सरकारचा पहिला उत्कृष्ट वक्ता पुरस्कार त्यांनीच पटकावला होता.

पुढील काळात ते शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १९९९ रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, वयोमानामुळं पुढं त्यांना फार सक्रिय राहता आला नाही. कालांतरानं ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

आगरी, कोळी समाजाचा यांच्यावर मोठा विश्वास होता. आगरी समाजातील अनिष्ट चालीरिती, कर्मकांडांना त्यांनी नेहमी विरोध केला. ‘आगरी दर्पण’ मासिकाच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार मांडत असत. दि बा पाटील यांच्या या कार्यामुळंच आज स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त त्यांच्या नावाचं आग्रह धरत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here