नांदेड : राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले असून यासाठी विद्यमान महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. हे सरकार म्हणजे निव्वळ टाईमपास आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार आहे. येत्या 26 जून रोजी नांदेडसह राज्यभरात 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा नेते व माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस सरकार असताना या संदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली होती. काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात भाजपा सरकारने अध्यादेश काढून आरक्षण टिकवून ठेवलं. पण विद्यमान महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण टिकवून ठेवण्यात कमी पडले आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

इतकंच नाहीतर हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात अपयशी ठरल्याचा आरोप राम शिंदे यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (VIjay Wadettiwar) यांनीही या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

जो पर्यंत ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here