चीनमध्ये करोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका चीनमधील वूहान प्रांताला बसला आहे. करोना व्हायरसच्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर चीनच्या वूहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीत हातील घेतली. ‘सी १७ ग्लोबमास्टर’ हे हवाई दलाचं अवजड वाहतूक करणारं विमान भारतीयांची सुटका करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. हे विमान २० फेब्रुवारीला दिल्लीहून रवाना होईल. चीनमध्ये त्याच दिवशी ते पोहोचेल. चीनमधून सर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी ही मोठी आणि सामरिक मोहीम सरकारने हाती घेतली आहे.
करोना व्हायरसमुळे आतापर्यंत १९०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील हजारो डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्राण संकटात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. करोनाच्या ११ हजारांहून अधिक रुग्णांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times