सूर्यकांत आसबे/सोलापूर

केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत देशभरातील अनेक शहरांमध्ये बदल घडवण्यासाठी प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पावर विरोधकांकडून वारंवार टीका करण्यात येते. अशातच सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून स्मार्ट सिटीच्या ( Smart City) कामाविषयी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चक्क चुराडा होताना सोलापूरकर डोळ्याने पाहत आहेत. स्मार्ट सिटीची अनेक कामे बोगस झाली आहेत. तसंच सध्या होत असलेल्या कामावरुन नागरिकांच्या जीविताशी जणू खेळच सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

कोंतम चौक ते कन्ना चौक मार्गावर गुरुवारी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी मोठे चेंबरसुद्धा बांधण्यात येत आहेत. मात्र स्मार्ट सिटीने आज तर कळसच केला. पाण्याची मोठी पाईपलाईन आडवी येत असताना व तिची अन्य जागेवरून व्यवस्था न करता थेट पाईपलाईनला चेंबरमध्ये घेऊन काम उरकण्यात आले. भविष्यात याच जलवाहिनीमधून गळती होऊन ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये जाऊन नागरिकांना विषबाधा झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल जनतेमधून विचारण्यात येत आहे.

या ठिकाणी कामकाज पाहणारे अभियंता यांनी तर काम पूर्ण झाल्यानंतर पिण्याची पाईपलाईन बाजूला घेणार असल्याचे उत्तर देत निष्काळजीपणाचा कळस केला. सोलापुरात स्मार्ट सिटीची बोगस कामे होत असताना लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्मार्ट सिटी कार्पोरेशनकडून हरताळ फासला जात असताना सत्ताधारी भाजप मात्र काहीही बोलण्यास तयार नसल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here