मृताचं नाव विग्नेश्वरण आहे. त्याचं वय २५ ते ३० दरम्यान होतं. शिर नसलेलं त्याचं धड आढळून आलं. त्याचे हात आणि पायही कापलेले होते. पोलिसांनी प्रकरण दाखल करून तपास सुरू केला. मृतदेहाचे तुकटे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
सीसीटीव्ही फुटेजमुळे धागेदोरे हाती लागले
एक महिला आणि एका पुरुषाला गोणीतून काहीतरी फेकताना काहींनी पाहिले होते. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. मग पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली. या चौकशीत महिलेने हत्येची कबुली दिली. मुलगा नशेबाज होता. दररोज घरी येऊन भांडणं करत होता. यामुळे वैतागून त्याची हत्या केल्याचं महिलेनं सांगितलं.
जेवणात विष कालवलं
मुलगा नशेबाज तर होताच पण चोऱ्याही करत होता. यामुळे रविवारी तो घरी आल्यावर आईने त्याच्या जेवणात विष कालवलं. जेवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून ते परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पण ते फेकण्यात महिलेला कुणी मदत केली, याचा तपास आता पोलीस करत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times