मुंबई: मुंबईत कालच्या तुलनेच नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ७८९ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८६३ इतकी होती. तर, आज दिवसभरात ५४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर आतापर्यंत एकूण १५ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. (mumbai registered 789 new cases in a day with 542 patients recovered and 10 deaths today)

मुंबईतील करोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मुंबई महानगरपालिकेला यश मिळाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांनंतर गेले काही दिवस करोनाला अटकाव झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट आता ९५ टक्के इतका असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ७२६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या ३५ हजार ७६४ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या ११ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८७ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईतील करोनाची आजची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ७८९
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ५४२
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९१६७०
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १४८१०
रुग्ण दुप्पटीचा दर- ७२६ दिवस
कोविड वाढीचा दर ( १७ जून ते २३ जून)- ०.०९ %

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, राज्यात देखील आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ८४४ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या किंचितशी कमी आहे. आज एकूण ९ हजार ३७१ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १९७ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here