संजूसिंग कृष्णासिंग भादा याच्या टोळीवर राज्यभरात दरोडे, चोऱ्या, फसवणूक आणि लुटीचे एकूण २८ गुन्हे दाखल असल्याचे समोर आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील तुळजाई मेडिकल व लाईफ लाईन हॉस्पिटलमधील सुभाष मेडिकल इथं २१ जून रोजी रात्री लुटीची घटना घडली होती. दरोडेखोरांनी तवेरा गाडीतून येऊन कुलूप तोडून दोन्ही मेडिकलमधून एकूण ३ लाख २० हजाराची चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान शहर पोलिसांनी संजूसिंग कृष्णासिंग भादा याला गुरूगोविंदसिंग कॉलनी जालना येथून ताब्यात घेण्यात आलं. या टोळीतील इतर आरोपींना अटक होणे बाकी आहे. या टोळीवर राज्यभरात दरोडे, चोऱ्या, जबरी चोऱ्या, फसवणूक आणि लुटीचे चाळीसगाव शहरात (जळगाव जिल्हा), औरंगाबाद शहर, वाशिम शहर, नागपूर ग्रामीण, धुळे, जालना, बुलडाणा आदी शहरात एकूण २८ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या कुख्यात दरोडेखोराला अटक केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times