: छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार यांच्या समर्थकांनी उद्योजक अशोक जिंदाल यांची कपडे फाडून त्यांच्या तोंडाला काळे फासले आहे. भोसले यांना गुंड म्हणत जिंदाल यांनी त्यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरल्याने हे कृत्य केल्याचा दावा उदयनराजे समर्थकांकडून करण्यात येत आहे.

इंदापूर MIDC मध्ये अशोक जिंदाल यांची कंपनी आहे. याच अशोक जिंदाल यांनी उदयनराजेंवर टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओत त्यांनी उदयनराजे यांचा साताऱ्याचा गुंड असा उल्लेख केल्याचा दावाही करण्यात आला. त्यामुळे इंदापुरात जिंदाल यांना काळं फासत त्यांची धिंडही काढण्यात आली आहे.

उद्योजक जिंदाल यांची धिंड काढणारे कोण?
उदयनराजेंचा अपमान झाल्याचं सांगत अशोक जिंदाल यांना काळे फासण्यात आले. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ही कृती केली आहे. शिवधर्म फाऊंडेशनमध्ये काम करणारे हे कार्यकर्ते उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक आहे.

अशोक जिंदाल यांना मारहाण केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिस स्थानकातही नेलं आणि उदयनराजेंचा अपमान केल्याबद्दल जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही पोलिसांकडे केली.

दरम्यान, अशोक जिंदाल यांची कपडे फाडून मारहाण करत शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही कायदा हातात घेतला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणी पोलिस नेमकी कोणावर आणि काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here