एक महिला आरोग्य कर्मचारी सिरिंजचे रॅपर फाडून त्यात करोनावरील लसीचा डोस न भरताच इंजेक्शन देत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओत दिसणारा तरुण हा अजहर हुसेन नावाचा आहे. हा व्हिडिओ त्याचा मित्र अमन खानने काढला होता. या व्हिडिओमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची पोलखोल झाली आहे. आरोग कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे करोनावरील लसीकरण मोहीमेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप होतोय.
माझा मित्र व्हिडिओ बनवत होता. संध्याकाळी व्हिडिओ बघितल्यावर रिकाम्या सिरिंजमध्ये करोनावरील लसीचा डोस भरला नसल्याचं लक्षात आलं, असं अजहर हुसेनने सांगितलं. ही घटना सत्य आहे. या प्रकरणी आरोग्य कर्मचारी महिलेकडून स्पष्टीकरण मागितले असून तिला कामावरून हटवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकारी डॉ. मेजर अजय कुमार यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times