पुणे: शहरासह जिल्ह्यात सातत्याने बाधितांची संख्या कमी होत असताना गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. पुणे शहरात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली. पुण्यात सध्या २५१६; तर जिल्ह्यात ८७२५ एवढे रुग्ण सक्रिय आहेत. ( )

वाचा:

पुण्यात ५६९६ एवढ्या चाचण्या गुरुवारी झाल्या आहेत. त्यापैकी शहरात ३३३ जणांना नव्याने झाला असून दोन दिवसांपासून शहरात बाधित रुग्ण वाढत आहेत. मध्ये २४५; तर ग्रामीण भागात ७६४ नवे बाधित आहेत. जिल्ह्यात एकूण १३४२ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात २५१६, पिंपरी-चिंचवडमध्ये ११४५; तसेच ग्रामीण भागात पाच हजारांहून अधिक रुग्ण सक्रिय असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे शहरात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी १४१ सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या चोवीस तासांत प्रत्येकी पाच; तर ग्रामीण भागात १४ अशा २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार ६७३ रुग्णांनी प्राण गमावले आहेत.

वाचा:

पुण्यात १८७, पिंपरी-चिंचवडमध्ये २३३ आणि ग्रामीण भागात ६६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत. पुण्यात बधितांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात १००६ रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यातील गुरुवारची स्थिती

नवीन रुग्ण : ३३३
बरे झालेले रुग्ण : १८७
दिवसभरात मृत्यू : ५

पिंपरी चिंचवडची स्थिती

नवीन रुग्ण : २४५
बरे झालेले रुग्ण : २३३
दिवसभरात मृत्यू : ५

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here