जम्मू-काश्मीरचे हटवणं म्हणजे ( ) काश्मीरीचं स्वातंत्र्य हिसकावण्यासारखं आहे. ज्या प्रकारे लसीवरून देशाची बदनामी झाली त्याच प्रकारे कलम ३७० हटवल्याने बदनामी झाली, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. एकीकडे ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत आणि दुसरीकडे टीएमसीचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा भाजपविरोधात तिसरी आघाडी बनवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांना बोलावून बैठक घेतात. पण जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्याची काय गरज होती? नागरिकांना आधी स्वातंत्र्य पाहिजे. पण तुम्ही त्यांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं. हा निर्णय देशाच्या कामी आला नाही. दोन वर्षात पर्यटकही जम्मू-काश्मीरला जाऊ शकले नाहीत. यामुळे देशाची मोठी बदनामी झाली, असा आरोप ममतांनी केला.
आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला भाजप देशद्रोही असल्याचा आरोप करते आणि स्वतःला राष्ट्रवादी म्हणवते. जे पण आवाज उठवतात त्यांना देशद्रोही आणि दहशतवादी बोललं जातं. देशातील नागरिकांना लसही देऊ शकत नाही. गंगेत मृतदेह वाहत आहेत. त्यांची नोंदणीही कुठे होत नाही. असे लोक इतक्या मोठ मोठ्या गप्पा कशा करतात? असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times