जळगाव: पती दारूच्या नशेत शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने या त्रासाला कंटाळून एका महिलेने रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आज रात्री ८ वाजता येथील येथे ही धक्कादायक घटना घडली. (वय ४५, रा. मेहरुण गावठाण) असे जखमी महिलेचे नाव आहे. ( )

वाचा:

उज्ज्वला यांचे पती हे गेल्या काही वर्षांपासून काहीच काम करीत नाहीत. संजय यांना दारूचे व्यसन जडल्याने व त्याच्या पूर्णपणे ते आहारी गेल्याने कौटुंबिक समस्या वाढतच गेल्या. त्यातून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. अशातच त्यांचा मोठा मुलगा अक्षय याने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि स्थिती आणखीच गंभीर बनली.

वाचा:

दरम्यान, आज रात्री पती संजय हे दारू पिऊन आल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा टोकाचे वाद झाले. यात उज्ज्वला यांनी घरातच अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. यानंतर त्या घराबाहेर सुमारे २० ते २५ मीटर लांब धावत आल्या. शेजारी राहणाऱ्या लोकांनी यावेळी प्रसंगावधान दाखवल्याने उज्ज्वला यांचे प्राण वाचू शकले. मात्र उज्ज्वला या ७० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रथम दाखल करण्यात आले. त्यानंतर तिथून त्यांना अधिक उपचारासाठी व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असून तब्येतीबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here