पुणे : मुंबई पोलिसांनी गुरुवारी बिल्डर श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे आणि इतरांविरुद्ध फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत यासंबंधी माहिती दिली. मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात बांधकाम करणार्‍या श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे आणि आर पाटील यांच्याविरोधात कलम 406, 420, 464, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक कामात फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. एका वृद्ध महिलेच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी रात्री उशिरा परांजपे बंधूंना पुण्याहून मुंबईला आणले. डीसीपी सिंगे हे म्हणाले की, “तक्रारदाराने आपल्या तक्रारीत माधव परांजपे आणि राघवेंद्र पाठक यांचेही नाव लिहले आहे.

खरंतर, आरोपींविरोधात जानेवारी 2020 मध्ये फसवणूक आणि बनावटपणाचा असाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणातही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही भावांना चौकशीसाठी बोलावले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे या महिलेस फसवून ताब्यात घेतल्याचा आरोप दोन्ही भावांवर आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here