मुंबई: उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांची चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेनं यावरून भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘एखाद्या पक्षाच्या बैठकीत असा ठराव होणं हे आश्चर्यकारक आहे. सीबीआय आणि हे भाजपचे सदस्य आहेत का,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार यांनी केला आहे. (Sanjay Raut Slams BJP Over Misuse of , )

वाचा:

ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ‘ईडी आणि सीबीआयशी आमचं काही व्यक्तिगत भांडण नाही. त्या केंद्रीय यंत्रणा आहेत. राष्ट्रीय पातळीवरील प्रकरणांच्या तपासाचे अधिकार त्यांना जरूर आहेत. मात्र, आम्ही सांगू तसं ते करतील ही जी पद्धत घालून दिली जात आहे ती घातक आहे. भाजपच्या वर्तनामुळं या संस्थांचं अवमूल्यन होत आहे. अजित पवार, अनिल परब किंवा आणखी कोणी असेल. त्यांच्या काही आरोप असतील तर त्या आरोपांची चौकशी करण्यास महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सक्षम आहेत. न्यायालय आहे. पण एखाद्या पक्षानं बैठक घेऊन ठराव करणं हे समजण्यापलीकडचं आहे,’ असं राऊत म्हणाले. त्याऐवजी भाजपनं सीआयए, केजीबी किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा ठराव करायला हवा होता, असं टोलाही त्यांनी हाणला.

वाचा:

‘भाजपनं आता हे थांबवायला हवं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे होत आली आहेत. हे सरकार तीन वर्षे देखील चांगल्या पद्धतीनं पूर्ण करेल. सीबीआ आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून आपलं सरकार येईल असं कोणाला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडताहेत,’ असं राऊत यांनी सुनावलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here