तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचंदेखील ते म्हणाले. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं. डेल्टा प्लस रुग्ण वाढीमुळे घाबरण्याचं काम नाही असंही ते म्हणाले.
जालना येथील सामान्य रुग्णालयात dpdc च्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन रूपांतरित करणाऱ्या आधुनिक 600 lpm च्याच प्लॅन्टमधून दररोज 125 सिलेंडर भरले जातील. 80लाख रुपयांच्या या प्रकल्पाचं काम झालं असून तो आज कार्यान्वित करण्यात आला. यावेळी जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल, नगरपालिकेच्या नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांची उपस्थिती होती.
याचवेळी पूर्ण आटोमेटिक केमिकल अनालायझर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. 50 रुग्णांच्या वेगवेगळ्या 360 चाचण्या एकाच वेळेस करता येऊ शकतील असे हे मशीन आता वापरात आलं आहे. यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘या गोष्टीचा मला आनंद होतो की हब स्पोक मॉडेलमध्ये कॅन्सरच्या उपचाराच्या दृष्टीने औरंगाबादच्या कॅन्सर रुग्णालयाचा स्पोक मॉडेलची जालन्यात सुरुवात करण्यात आली.
ओपीडीची आज सुरुवात झाली असून येथील सगळ्या डॉक्टर व नर्सेसना टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथील डॉक्टर ट्रेनिंग देण्याचे काम करणार आहे. येणाऱ्या काळात सी एस आर व शासनाच्या मदतीतून कोबाल्ट युनिट म्हणजे रेडिएशन युनिट ज्याची किंमत तीस ते पस्तीस कोटी असणार ही देखील जालन्यात करण्याचा आमचा मानस आहे. या नवीन सुविधेमुळे एक महिना पेशंटला नंबर लावायला लागायचा तो आता संपणार असून रुग्णांना तात्काळ इथे सुविधा मिळणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times