किरिट सोमय्या मुंबईच आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात असलेले दापोली मुरूड येथे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचे बंगले आहेत, तर अलिबागकडील मुरूडमध्ये उद्धव ठाकरे व रविंद्र वायकर यांचे बंगले आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कागदावर १९ बंगलो उभे करतात, दुसऱ्या बाजुला मिलिंद नार्वेकर २५ कोटींचा बंगला बांधतात, तर तिसऱ्या बाजूला परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट बांधला आहे. या रिसॉर्टच्या बाजूलाच त्यांचा बंगला देखील आहे. या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगल्यांची, म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, ही आमची मागणी असल्याचे सोमय्या म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांना त्याच वाटेने जावे लागेल असे सोमय्या म्हणाले. मिलिंद नार्वेकर यांनी दापोली-मुरूड समुद्र किनाऱ्यावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. हा बंगला अनिल परब यांच्या घरापासून काही फुटांवर आहे. या बंगल्यासाठी समुद्रातील साडेचारशे झाडे कापली आहेत. त्या जागेची किंमत १० कोटी इतकी आहे. तेथे दोन मजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन असावे असे दिसते आहे, असे सोमय्या म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
मिलिंद नार्वेकरांनी या बांधकामासाठी कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलेली नाही. शेजारीच असल्याने अनिल परब हे मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर जात असतात. तसेच मिलिंद नार्वेकर हे देखील परब यांच्या बंगल्यावर जात असतात. या दोघांच्याही बंगल्यांची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे घेत असतात, असा थेट आरोप सोमय्या यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे’
या बंगल्यासाठी यांनी ग्रामपंचायतीची खोटी कागदपत्रे तयार केली आहेत आणि याबाबत तहसीलदाराला काहीही माहिती नसल्याचे सोमय्या म्हणाले. एवढे झाल्यानंतरही काही कारवाई करण्यात आलेली नाही. हा बंगला लॉकडाउनच्या काळात बांधलेगेले. लॉकडाउनच्या काळात उद्धव ठाकरेंचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते, तर उद्धव ठाकरेंचा डावा हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगला बांधत होते, असे सांगतानाच शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे, असा टोला किरीट सोमय्यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times