मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापे ( Former Maharashtra Home Minister Reaction On ) मारण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. तसंच आयपीएस अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिस आयुक्त पदावर असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. मात्र सिंग यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आयुक्तपदावरून दूर करण्यात आलं आणि त्यांनंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांना माझ्यावर आरोप करायचेच होते तर त्यांना आयुक्त पदावर असताना आरोप का केले नाहीत?’ असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांच्यावर आरोप
‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली. या प्रकरणात सामील असणाऱ्या सचिन वाझेसह विनायक शिंदे आणि इतर सर्व वादग्रस्त अधिकारी परमबीर सिंग यांनाच रिपोर्टिंग करत होते. यातील बहुतांशी अधिकारी आता तुरुंगात आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याने आम्ही त्यांना पदावरून दूर केलं आणि याच कारणातून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले,’ असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, ‘याप्रकरणी चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. मी यापुढेही सर्व प्रकारच्या चौकशीला सहकार्य करणार आहे,’ असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here