मुंबई: राज्यात आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी घट झाली असून गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ६७७ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याच दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकूण १० हजार १३८ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १५६ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 9677 new cases in a day with 10138 patients recovered and 156 deaths today)

आजच्या १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ७२ हजार ७९९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ७१५ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १७ हजार ५६२ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ४६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १४ हजार १८२ इतका आहे. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ५३७ इतकी आहे. साताऱ्यात ७ हजार २९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ९०८ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार १९७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये ३ हजार ४६७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ३५०, नांदेडमध्ये ही संख्या ९६९ इतकी आहे. जळगावमध्ये १ हजार ०६८, तसेच तर रायगडमध्ये एकूण ५ हजार ७०६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ६०५ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ११३ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
६,३३,७४८ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ०५ लाख ९६ हजार ९६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख १७ हजार ०३५ (१४.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३३ हजार ७४८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here