म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डेल्टा प्लसमुळे सतर्कता बाळगणे आवश्यक असून, त्याचाच भाग म्हणून दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लावली जाणार आहे. तसेच दुकाने उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळादेखील निश्चित केल्या जाणार असून, शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन लावले जाणार आहे. त्याचवेळी जळगाव जिल्ह्याला जोडणाऱ्या सीमांवर चाचणी अनिवार्य केली जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे. या संदर्भात सोमवारच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचेही कळवण्यात आले आहे. ( will be imposed in on saturdays and sundays)

राज्यात डेल्टा व व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. शेजारच्या जळगाव जिल्ह्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने आपल्याला सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. जळगावला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील एन्ट्री पॉईंटवर (चेक नाके) आरटी-पीसीआर चाचण्या कडक करण्यात येणार असून चाचणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा लेव्हल तीनमध्ये आहे.

क्लिक करा आणि वाचा-
लेव्हल तीनमधील मार्गदर्शक त्तवानुसार दुकाने तसेच सर्व खाजगी आस्थापनांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जाणार आहेत. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीदेखील लावली जाईल. तसेच शनिवारी व रविवारी पूर्णत: लॉकडाऊन लावला जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरण करण्यावरही भर दिला जाणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-
करोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिक दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून दिला जाणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here