वृत्तसंस्था, मुंबई

अनेकदा आपण ठरवतो तसेच न घडता काही अनपेक्षित घटना घडतात आणि आयुष्य एका अंधाऱ्या वळणावर येऊन उभे राहते. मुंबईतील वांद्र्यामध्ये राहणाऱ्या डॉ. पुनीत मेहरा यांच्याबरोबरही असेच काहीसे घडले आहे. एका अनपेक्षित घटनेने डॉ. मेहरा यांच्या आयुष्याला असे वळण दिले की, ते आज आपल्या आईचे विषाणूच्या उद्रेकाला तोंड देणाऱ्या चीनमध्ये अडकलेले शव भारतात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

२४ जानेवारी २०२० रोजी डॉ. मेहरा आणि त्यांची आई रिटा मेहरा यांनी मेलबर्न येथून बीजिंगमार्गे मुंबईला येण्यासाठी एअर चायनाच्या विमानाने उड्डाण केले. विमानाने उड्डाण केल्यानंतर सुमारे नऊ तासांनी रिटा स्वच्छागृहात गेल्या. बराच वेळ होऊनही त्या आपल्या आसनावर न परतल्याने डॉ. पुनीत यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. स्वच्छतागृहाचे दार उघडल्यानंतर रिटा बेशुद्धावस्थेत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विमान आपत्कालीन परिस्थितीत चीनच्या झेंगझोऊ विमानतळावर उतरवण्यात आले. तिथेच रिटा यांचे

निधन झाले. ७ फेब्रुवारी रोजी डॉ. पुनीत भारतात परत आले. मात्र, त्यांच्या आईचे शव आजही झेंगझोऊ येथील शवगृहात आहे. याबाबत डॉ. पुनीत यांनी चीनमधील भारतीय दूतावास, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आईचे शव परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. ‘चीनमधील भारतीय दूतावासातील वाणिज्यदूत अरविंद कुमार यांनी माझ्या पत्रला उत्तर दिले असून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, सध्या चीनमधील परिस्थितीही गंभीर असल्याने मदत करण्यात विलंब होत असल्याचे म्हटले आहे,’ असे डॉ. पुनीत यांनी सांगितले.

मेहरा यांनी पुढे सांगितले की, त्यांना चीनमधील भारतीय दूतावासात अरविंद कुमार (वाणिज्यदूत) यांचेकडून उत्तर मिळाले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here