क्लिक करा आणि वाचा-
शरद पवार यांनी ट्विट करत काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये जाऊन नऊ ते दहा गोष्टी आम्ही तातडीने करू असे आश्वासन दिल्याची आठवण पवार यांनी करून दिली आहे. आजपर्यंत त्यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नसल्याची माहिती काश्मीरमधील तरूण पिढी आम्हाला सांगत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘प्रश्न असा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये जाऊन नऊ ते दहा गोष्टी आम्ही तातडीने करू असं जाहीर केलं होतं. आजपर्यंत त्यातली एकही गोष्ट झालेली नाही, हे काश्मीरमधली तरुण पिढी आम्हाला सांगते. पुन्हा एकदा त्यांनी काश्मीरच्या सर्व तरुण नेत्यांना बोलावलं.’
क्लिक करा आणि वाचा-
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरबाबत जे निर्णय घेतले त्याचे परिणाम वाईट होतील असे आम्ही सांगत होतो याची आठवण पवार यांनी करून दिली. केंद्र सरकारने आमचे न ऐकताच हे निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. मात्र, वर्ष-दीड-वर्षाने का होईना आपला हा निर्णय योग्य नाही या निर्ष्कर्षाप्रत राज्यकर्ते आले आणि तो निर्णय बदलायची तयारी त्यांनी दाखवली, आम्ही त्याचं स्वागत करतो, असे पवार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे. पण मागे जसे त्यांनी जाहीर केले आणि काही झाले नाही तसे होऊ नये अशी अपेक्षा आहे,असेही पवार यांनी अधोरेखित केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times