नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना स्मार्ट सिटी मिशनला ६ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी-२०२० स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात ( smart city award 2020 ) आला. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्हिडिकॉन्फरन्सिंगद्वारे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना पुरस्कार ( ) जाहीर केले. ( )

देशातील १०० स्मार्ट सिटीत सर्वोत्तम कामगिरीत सुरत आणि इंदूरने बाजी मारली आहे. तर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. मध्य प्रदेशला पहिले आणि तामिळनाडूहे दुसरे उपविजेते ठरले आहेत. २०१९ मध्ये सुरत हे शहर एकमेव स्मार्ट सिटीचे विजेते होते. मात्र यावेळी स्मार्ट सिटीचा पुरस्कार सुरतला इंदूरसोबत विभागून घ्यावा लागला.

यूपीने ७ शहरांना स्मार्ट सिटी बनवले, म्हणून पहिल्या क्रमांकवर

केंद्र सरकारने पहिल्यांदाच राज्यांना त्यांच्या शहराच्यां सर्वोत्तम कामगिरीवर आणि त्यांच्या उत्तम भूमिकेवर पुरस्कार दिला आहे. यानुसार आपल्या बळावर ७ शहरांना स्मार्ट सिटी बनवणाऱ्या उत्तर प्रदेशला पहिला पुरस्कार मिळाला आहे. मेरठ, गाझियाबाद, अयोध्या, फिरोझाबाद, गोरखपूर, मथुरा-वृंदावन आणि सहारनपूर या शहरांचा त्यात समावेश आहे.

कोविड इनोवेशन कॅटेगरीत कल्याण आणि वाराणसी विजेते

मंत्रालयाने कोविड इनोवेशन कॅटेगरीत संयुक्त विजेते घोषित केले आहेत. यात महाराष्ट्रातील कल्याण-डोंबिवली आणि यूपीतील वाराणसीने पुरस्कार जिंकला आहे. स्मार्ट सिटी मिशननुसार आगामी ५,९२४ प्रस्तावित प्रोजेक्टचा खर्च हा १.७८ लाख कोटी रुपये आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. ५,२३६ प्रोजेक्टसाठी वर्क ऑर्डर जारी करण्यात आली आहे. ४५,०८० कोटी रुपयांचे २,६६५ प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत किंवा काम सुरू आहे, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

९ शहरांना ४ स्टार रेटिंग

७० स्मार्ट सिटीजनी आपले इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर्स डेव्हलप केले आहेत. ही शहरं मिशननुसार आणि उपलब्ध पायाभूत सुविधांसोबतच कोविड व्यवस्थापनासाठी वॉर रूम प्रमाणे काम करत आहेत. असे सेंटर आता सर्व १०० शहरांमध्ये उभारले जाणार आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली.

क्लाइमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क (CSCAF) २.० वर एक अहवाल जारी केला आहे. यात १२६ शहरांचा समावेश आहे. यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या ९ शहरांना 4 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. यात सूरत, इंदूर, अहमदाबाद, पुणे, विजयवाडा, राजकोट, विशाखापट्टणम, पिंपरी-चिंचवड आणि बडोद्याचा समावेश आहे. स्मार्ट सिटीज लीडरशिप पुरस्कार हा अहमदाबाद, वाराणसी आणि रांचीला मिळाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here