मी तुमच्यापासून दूर नाहीए. प्रोटोकॉलमुळे काही प्रमाणात हे अंतर निर्माण झाले आहे. पण तुम्ही आपल्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. देशात स्वातंत्र्यानंतर मोठा विकास झाला आहे. विकासात योगदान देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पण अनेकदा धरणे आंदोलन किंवा निदर्शनांदरम्यान ट्रेन रोखल्या जातात. पेटवल्याही जातात. हे अतिशय चुकीचं आहे. रोषात येऊन अशी पावलं उचलल्याने त्याचे विपरित परिणाम कुठेना कुठे आपल्यावरच होतात, असं कोविंद म्हणाले.
शिक्षकांना मिळते सर्वाधिक वेतन
देशात सर्वाधिक वेतन हे राष्ट्रपतीला मिळते. आम्हाला ५ लाख रुपये वेतन मिळतं. पण त्यापैकी पावणे तीन लाख रुपये हे टॅक्स कापला जातो. मग सांगा उरले किती रुपये? जितके उरले त्याहून कितीतरी अधिक वेतन अधिकारी आणि इतरांना मिळते. इथे शिक्षकही आहेत. त्यांना तर सर्वाधिक वेतन मिळते, असं राष्ट्रपती कोविंद म्हणाले.
१५ वर्षांनी राष्ट्रपतींचा ट्रेनने प्रवास
१५ वर्षांनी राष्ट्रपती ट्रेनने प्रवास करत आहेत. यापूर्वी २००६ मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या पासिंग आउट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे ट्रेनने गेले होते. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादही कायम ट्रेनने प्रवास करत होते. राष्ट्रपती झाल्यानंतर ते बिहारमधील आपल्या जीरादोई गावात विशेष ट्रेनने गेले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times